नाट्य कार्यशाळा

 
 
 
 
 
natya-sanskar-logo

वैचारिक विकसन नेतृत्वगुण सौंदर्यदृष्टी आत्मविश्वास एकाग्रता सभाधीटपणा शरीर भाषा संघभावना निरीक्षणशक्ती वाणी संस्कार संवाद कौशल्य अभिनय कौशल्य तांत्रिक नाट्यांगांची ओळख व्यक्तिमत्व विकास सर्जनशीलता कल्पनाशक्ती

'प्रेरणा' च्या कार्यशाळेत घेतल्या जाणाऱ्या विविध रंगमंचीय खेळ व प्रात्यक्षिकांमधून सकारात्मक विचारांची प्रक्रिया सुरू होते आणि हळू हळू सातत्याने अनेक चांगल्या गोष्टींची सवय लागते. मग वेगवेगळी कौशल्य विकसित होऊ लागतात. यातूनच घडू लागते एक सुंदर व्यक्तिमत्व. प्रत्येक व्यक्तिमत्व वेगळे असते, त्याचा विकासाचा वेग वेगळा असतो. अशा अनेक बाबी लक्षात घेऊन सर्व शिबिरार्थींना एकत्रितपणे घडविण्याचे कसब या कार्यशाळेत असते. यातूनच शिबिरार्थींच्या वैयक्तिक विकसनासाठी खालील उद्दिष्टे समोर ठेवली जातात.

या सगळ्यासाठी आमच्या कार्यशाळा हे आम्ही उचललेले एक लहानसे पाऊल.

यामध्ये बालकुमारांबरोबर व्यावसायिक, नोकरदार, शिक्षक, गृहिणी इत्यादींचा समावेश असतो. या सर्वांनाच 'प्रेरणा' च्या कार्यशाळेमधून स्वतःमध्ये बदल घडवण्यासाठी एक निश्चित दिशा आणि आत्मविश्वास मिळत असतो.

'प्रेरणा' तर्फे सादर होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये विविध नाट्याविष्कार, साहित्यवाचन, संगीत, नृत्य यांचा अंतर्भाव असतो. याचबरोबर मूल्य शिक्षणासाठी गरजेचे असलेले इतरही अनेक उपक्रम राबवले जातात.

यापैकीच काही ठळक कार्यक्रम खालीलप्रमाणे:

पु.ल. आजोबा

रंगमंचीय कार्यक्रम

पु. ल. देशपांडे ह्या बहुरंगी आणि बहुढंगी व्यक्तिमत्वाच्या साहित्य आणि कलाकृतींवर आधारित पु.ल. आजोबा हा रंगमंचीय कार्यक्रम. लेखक, संगीतकार, अभिनेता, वक्ता, कथाकथनकार, दिग्दर्शक, हार्मोनियम वादक, इ. विविध पैलू ह्या असामान्य व्यक्तिमत्वामध्ये सामावलेले होते. आमच्या बाल-कुमार कलाकारांना भावलेले आणि समजलेले पु.ल. आजोबा ह्या कार्यक्रमातून मांडण्याचा हा प्रयत्न आबालवृद्ध रसिक प्रेक्षकांना भावला आहे. लहानांबरोबर मोठ्यांनीही अनुभवण्यासारखा आहे.

संकल्पना व दिग्दर्शन : स्वाती उपाध्ये

आणखी क्षणचित्रे

कौन बनेगा कचरापती

कचाऱ्याच्या समस्येवर निसर्ग आपल्याला विविध प्रकारे सावध करत असतो तसेच मदत करत असतो. निसर्गातल्या प्राणी आणि पक्ष्यांनी ह्या समस्येवर कसे उत्तर शोधले आहे ते ह्या दीर्घांकामधून सादर होते.

लेखन आणि दिग्दर्शन : स्वाती उपाध्ये

आणखी क्षणचित्रे

आजोबांची गोष्ट

निरागस आणि प्रेमळ मुले एका गरीब आजोबांशी कशी मैत्री करतात आणि संकटकाळी त्यांना कशी मदत करतात त्याची ही हळुवार कहाणी.

लेखन आणि दिग्दर्शन : स्वाती उपाध्ये

आणखी क्षणचित्रे

G1WW

दीर्घांक

जलसंवर्धनाचे महत्व विषद करणारा दीर्घांक

लेखन आणि दिग्दर्शन : स्वाती उपाध्ये

आणखी क्षणचित्रे

फुलण्यात मौज आहे खरी

बालनाटिका

प्रवीण दवणे यांच्या कथेवर आधारित बालनाटिका.

दिग्दर्शन : स्वाती उपाध्ये

आणखी क्षणचित्रे

कौन बनेगा कचरापती

पर्यावरण नाट्य

माणसांच्या दुनियेतल्या कचऱ्याकडे कचरा म्हणून न बघणारे निसर्गातले घटक आणि त्यांच्या गमती जमती. या संकल्पनेवर आधारित एक पर्यावरण नाट्य.

लेखन आणि दिग्दर्शन : स्वाती उपाध्ये

आणखी क्षणचित्रे

'आमची नाट्यशाळा - चक्क रंगभूमीवर'

रंगमंचीय खेळ

रंगमंचीय खेळ प्रेक्षकांसमोर सादर करून त्यांचे महत्व पटवून देणारा आगळावेगळा कार्यक्रम.

आणखी क्षणचित्रे

पाऊस पैंजण

बाल-कुमार कलाकारांनी सादर केलेला 'मराठी' कवितांवरील एक श्रवणीय आणि प्रेक्षणीय कार्यक्रम.

संकल्पना : स्वाती उपाध्ये

आणखी क्षणचित्रे

'उडून गेलेल्या चिमण्यांना…'

द्रुक-श्राव्य कार्यक्रम

कवी ग्रेस यांच्या साहित्यावर आधारित अभिवाचन आणि गायनाचा अंतर्भाव असलेला एक द्रुक-श्राव्य कार्यक्रम.

दिग्दर्शन : स्वाती उपाध्ये, संहिता लेखन : धनश्री केतकर

आणखी क्षणचित्रे

अनेक क्षेत्रात आत्मविश्वासपूर्वक शिक्षण घेणारे आणि व्यावसायिक कामगिरी करणारे प्रेरणाचे शिबिरार्थी व कलाकार अनेक स्पर्धा, दूरचित्रवाणी मालिका, चित्रपट, लघुपट यामधून गुणवत्तापूर्ण सादरीकरण करत आहेत.